Maharastra today news
Crime news यवत पोलिसांची धडक कारवाई; गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह आरोपी ताब्यात
प्रतिनिधी :राम कांबळे,
प्रतिनिधी :राम कांबळे,
बोरीभडक | दौंड | पुणे ग्रामीण
दौंड तालुक्यातील बोरीभडक परिसरात यवत पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीविरुद्ध कारवाई करत त्याला विनापरवाना गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. ऋषभ रमेश बडेकर (वय ३०, रा. बडेकरवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता बोरीभडक फाटा ते बोरीभडक गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे ५०० मीटर अंतरावर एक इसम विनापरवाना गावठी पिस्टल बाळगत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे यवत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पडताळणी केली. यावेळी ऋषभ बडेकर हा विनापरवाना व बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल जवळ बाळगताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस, असा एकूण २५ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात शस्त्र बाळगण्यास बंदीचा आदेश लागू असताना आरोपीने त्याचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषभ बडेकर याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), (३) सह १३५ अन्वये यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, संदिप देवकर, महेंद्र चांदणे, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, मारुती बाराते, अमोल भुजबळ, प्रतिक जगताप, सचिन गुंड, दिनेश लोणकर आणि विनीत कुऱ्हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दौंड तालुक्यातील बोरीभडक परिसरात यवत पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपीविरुद्ध कारवाई करत त्याला विनापरवाना गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. ऋषभ रमेश बडेकर (वय ३०, रा. बडेकरवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता बोरीभडक फाटा ते बोरीभडक गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे ५०० मीटर अंतरावर एक इसम विनापरवाना गावठी पिस्टल बाळगत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे यवत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पडताळणी केली. यावेळी ऋषभ बडेकर हा विनापरवाना व बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल जवळ बाळगताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस, असा एकूण २५ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात शस्त्र बाळगण्यास बंदीचा आदेश लागू असताना आरोपीने त्याचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषभ बडेकर याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), (३) सह १३५ अन्वये यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रॉकी देवकाते करीत आहेत. तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, संदिप देवकर, महेंद्र चांदणे, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव, मारुती बाराते, अमोल भुजबळ, प्रतिक जगताप, सचिन गुंड, दिनेश लोणकर आणि विनीत कुऱ्हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध यवत पोलिसांकडून यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
