ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Election news सुपे गावात राजकीय वातावरण तापले; दोन्ही पक्षांच्या गाठीभेटींमुळे चर्चांना उधाण, मात्र वारे अपक्षाकडे फिरले


महाराष्ट्र टुडे न्यूज,,

Election news सुपे गावात राजकीय वातावरण तापले; दोन्ही पक्षांच्या गाठीभेटींमुळे चर्चांना उधाण, मात्र वारे अपक्षाकडे फिरले

बारामती | प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सुपे गावात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून, गावातील वातावरण सध्या पूर्णपणे तापलेले दिसत आहे. प्रमुख दोन्ही राजकीय पक्षांकडून सुरू असलेल्या गाठीभेटी, बंद दाराआड बैठका आणि अंतर्गत चर्चा यामुळे गावात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पक्षांकडून संभाव्य उमेदवारांच्या नावांवर जोरदार खलबते सुरू असून, कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये अपक्ष उमेदवार रिंगणात राहिल्यास लोकांचा कल स्पष्टपणे अपक्षाकडे झुकण्याची दाट शक्यता आहे, अशी जोरदार चर्चा सुपे गावात ऐकू येत आहे.



दरम्यान, ग्रामस्थांमध्ये पक्षीय राजकारणाबाबत नाराजीचे सूर अधिक तीव्र होताना दिसत आहेत. वारंवार होणाऱ्या गाठीभेटी, आश्वासनांची रेलचेल आणि अंतर्गत राजकारणामुळे गावाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला प्रश्न आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील विकासकामांवर ठोस भूमिका न घेता केवळ राजकीय गणिते मांडली जात असल्याने ग्रामस्थांनी पक्षीय राजकारणाकडे पाठ फिरवल्याची स्पष्ट चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर स्वतंत्र, विश्वासार्ह आणि गावाशी थेट जोडलेले नेतृत्व पुढे यावे, अशी ठाम मागणी सुपे परिसरात जोर धरू लागली आहे. त्यामुळेच आता गावात अपक्ष उमेदवाराच्या नावाची चर्चा अधिक वेगाने सुरू झाली आहे.

👉 या सर्व चर्चांचा केंद्रबिंदू ठरत असून, मोहिनी गणेश खैरे यांचे नाव अपक्ष उमेदवार म्हणून जोरात पुढे येत आहे. स्थानिक प्रश्नांची सखोल जाण, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग, तसेच गावातील सर्व घटकांशी असलेला थेट संवाद यामुळे ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन काम करणाऱ्या उमेदवारालाच संधी द्यावी, अशी भावना आता सुपे गावात बळावत आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून मोहिनी गणेश खैरे यांची उमेदवारी राहण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.
थोडक्यात काय तर, निवडणुकीची सूत्रे आता पक्षांच्या हातातून सुटून थेट जनतेच्या हातात गेल्याचे चित्र सुपे गावात स्पष्टपणे दिसून येत असून, येणारी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पक्षीय नव्हे तर व्यक्ती, विश्वास आणि कामगिरीवर लढवली जाण्याची चिन्हे ठळक होत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |