![]() |
जाहीर निषेध ! बारामती येथील,सुपे गाव — कडकडीत बंद
सुपे परगण्याच्या ओळखीचा आणि ऐतिहासिक वारशाचा अभिमान असलेला भुईकोट किल्ला काही व्यक्तींनी बनावट व चुकीचे दस्तऐवज तयार करून बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या पवित्र, ऐतिहासिक आणि सर्वसामान्यांच्या श्रद्धास्थान असलेल्या किल्ल्यावर नांगर फिरवून केलेल्या या कृत्याने संपूर्ण परगण्यात संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिक, ऐतिहासिक प्रेमी, ग्रामस्थ व विविध संघटनांनी हा प्रकार “इतिहासाच्या जखमेवर मीठ चोळणारा कृत्य” असल्याचे सांगत तीव्र निषेध नोंदवला आहे.
सुपे गाव आज कडकडीत बंद पाळत आहे.
किल्ल्याच्या संरक्षणासाठी व सत्य परिस्थिती बाहेर येण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने चौकशीची मागणी केली आहे.
इतिहास, स्वाभिमान आणि वारशाच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आहोत — हा निषेध आहे, ही लढाई आहे आपल्या ओळखीची!
