पुणे - आणि थायलंडच्या सांस्कृतिक विश्वाला जोडणाऱ्या एका भव्य स्पर्धेत बारामतीच्या शिवराज कुंडलकरने भारताचा झेंडा उंचावला आहे. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे आणि बुराफा युनिव्हर्सिटी, पटाया—थायलंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तबला वादन स्पर्धेत शिवराजने जूनियर गटात गोल्ड मेडल पटकावत प्रथम क्रमांक मिळवला आहे.”
“जागतिक दर्जाच्या या स्पर्धेत विविध देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट लय, नाद आणि सादरीकरणाच्या जोरावर शिवराजने परीक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे, बुराफा युनिव्हर्सिटी, पटाया यांच्या वतीने त्याला स्टार गोल्ड अवॉर्डही प्रदान करण्यात आला आहे
“बारामतीचा हा तरुण तबलावादक आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकल्याने महाराष्ट्राचं नाव आणखी उज्ज्वल झालं आहे. शिवराज कुंडलकरवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.”
