![]() |
पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आता एक नवा मोठा मासा समोर आला आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले पार्थ पवार — या प्रकरणात त्यांना जमीन विकणाऱ्या ‘शीतल तेजवानी’ या नावावर आता लक्ष केंद्रीत झालं आहे.
शीतल तेजवानी नेमक्या कोण? त्यांची पार्श्वभूमी काय? आणि जमीन व्यवहारात त्यांची भूमिका नक्की काय आहे—हे प्रश्न आता जोरदार चर्चेत आहेत.प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील महत्त्वाच्या भूखंडांच्या खरेदी-विक्रीत शीतल तेजवानी या मध्यस्थ किंवा व्यवहारकर्त्या म्हणून काम करत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.या व्यवहारांमध्ये किंमत ठरवणे, पक्षकारांना जोडणे आणि जमीन मालकांसोबत व्यवहार निश्चित करणे—या सर्व गोष्टींमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पार्थ पवारांना संबंधित जमीन विक्रीतही शीतल तेजवानी यांचा थेट संबंध असल्याच्या चर्चा जोरात असून, तपास यंत्रणा आता त्या संपूर्ण व्यवहाराचा कागदोपत्री मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकरणात आणखी कोणाचे नाव समोर येते?नक्की कोणत्या मार्गाने हा जमीन व्यवहार झाला?किंवा अजून कुठले नवे उलगडे होतात?
याकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागलेले आहे.
