पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सहा विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत राऊंड जप्त करूनखुनाचा कट उघडकीस आणला आहे.
मा. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिलेल्या आदेशानुसार
इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याचे निर्देश सर्व पथकांना देण्यात आले होते.
त्याअन्वये, खंडणीविरोधी पथकातील अधिकारी इन्स्टाग्रामवर माहिती पाहत असताना
“adyaa” या आयडीवर एका व्यक्तीने हातात दोन पिस्टल धरून फोटो पोस्ट केल्याचे निदर्शनास आले.
ही माहिती मिळताच पथकाने तात्काळ तपास सुरू केला.
या तपासादरम्यान, राजीव गांधी ब्रिज परिसरातून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान त्याच्या दोन मित्रांच्या हालचालींवर संशय असल्याचे समोर आले.
पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यातील आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
पथकाने सांगवी परिसरात छापा टाकून
आणखी दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले
आणि त्यांच्या कब्ज्यातून १ लाख १ हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल व दोन राऊंड जप्त केले.
सखोल चौकशीत उर्वरित तीन विधीसंघर्षित बालकांची माहिती मिळाली आणि त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या सहाही बालकांनी चौकशीत रवी ससाने, रा. वाघोली या व्यक्तीचा
अंडाबुर्जी गाडीच्या वादातून खून करण्याचा कट रचल्याची कबुली दिली.
यात वापरले जाणारे पिस्टल गुरूसिंग, रा. उमराठी, मध्यप्रदेश येथून आणल्याचाही खुलासा झाला.
या सर्वांविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात
भारतीय न्याय संहिता कलम ६१(२), ३(५),
हत्यार कायदा कलम ३(२५),
महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५
अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई
मा. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,
मा. सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर,
मा. अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड,
मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार,
मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) प्रविण मोरे
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाई खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील
आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार
सुनिल भदाणे, अमर राऊत, रमेश गायकवाड, प्रदीप पोटे, रमेश मावसकर,
प्रदीप गोंडाबे, किशोर कांबळे, गणेश गिरीगोसावी, किरण जाधव,
भूपेंद्र चौधरी, निलेश जाधव, दादाभाऊ साबळे आणि भरत गाडे
यांनी संयुक्तपणे केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सहा विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत राऊंड जप्त करून कुणाचा कट उघडकीस आणला आहे
November 07, 2025
