दामीनी पथकाची धडक कारवाई : शाहू कॉलेजसमोरील टवाळखोर ताब्यात
लातूर शहरातील मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत दामीनी पथकाने शाहू कॉलेज, बसवेश्वर चौक परिसरात मुलींना टिंगल-टवाळ्या व त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर आज कारवाई केली.
पीडित विद्यार्थिनीने दामीनी पथकाच्या मो. नं. 8830115409 वर तक्रार केल्यानंतर पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित तरुणांना ताब्यात घेऊन आवश्यक ती कारवाई केली.
मागील एका महिन्यात दामीनी पथकाने शहरात ५२ टवाळखोरांविरुद्ध कारवाई केली आहे. पथकात १ महिला पोलीस अधिकारी व ६ अंमलदारांची नियुक्ती असून स्वतंत्र शासकीय वाहन उपलब्ध आहे.
कोणत्याही मुली-महिलांना छेडछाड, टॉन्टींग किंवा त्रास होत असल्यास त्यांनी दामीनी पथकाच्या 8830115409 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले असून तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली,उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे,दामीनी पथक प्रमुख आरती पोचार,सहकारी प्रशांत नागरगोजे व पल्लवी चिलगर यांनी केली.
