धनराज गवळी यांना ‘लोकमत प्रोफेशनल आयकॉन बिझनेस अवॉर्ड महाराष्ट्र’ प्रदान
पुणे :महाराष्ट्रातील उद्योजकता, प्रेरणादायी नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी यांचा गौरव करणारा ‘लोकमत प्रोफेशनल आयकॉन बिझनेस अवॉर्ड महाराष्ट्र’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आदरणीय धनराज गवळी यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आदरणीय प्रकाश आंबिटकर यांच्या शुभहस्ते, पुणे येथील हयात हॉटेल येथे आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी धनराज गवळी यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली. https://youtu.be/xontLXv68Rs?si=R9_iU_AOb1CDF-H8
धनराज गवळी यांनी या सन्मानाबद्दल लोकमत दैनिक टीमचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की,
“महाराष्ट्रात असंख्य युवा नेतृत्व कार्यरत आहे; त्यामध्ये माझ्या कार्याची दखल घेऊन मला सन्मानित केल्याबद्दल मी लोकमत टीमचे आणि मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो. असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या.”
पुरस्कार सोहळ्याला उद्योग क्षेत्रातील मान्यवर, लोकमत मीडिया समूहाचे अधिकारी व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
