प्रतिनिधी फिरोज मोगल
लातूर | दि. 08 नोव्हेंबर 2025सहा महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख शक्ती उर्फ योगेश अशोक गुरणे याला लातूर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. त्याचा उजवा हात आकाश उर्फ अक्षय सुरेश सगर हाही पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे. दोघांना आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पीसीआर मिळाली आहे.
हि कारवाई देवगिरी बार, औसा रोड येथे 4 जून रोजी झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी करण्यात आली. फिर्यादीकडून महिन्याला 2000 रुपये हप्ता व मुलांसाठी फुकट सुपारी न दिल्याच्या कारणावरून आरोपींनी लोखंडी कत्ती व खुर्चीने जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी IPC-2023 अनुसार कलम 109, 308(1), 189(2), 191(2)(3), 190 प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
या प्रकरणातील एकूण सहा आरोपी फरार होते. त्यापैकी प्रमुख दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील लोखंडी कत्ती जप्त केली आहे. तपासादरम्यान आरोपींच्या विरुद्ध खंडणी, दरोडे, जबरी चोरी, मारहाण, दहशत अशा गंभीर स्वरूपाचे 11 गुन्हे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे
.बारामतीच्या शिवराज कुंडलकरला थायलंडमध्ये वादनात गोल्ड मेडल तबला
या आरोपींच्या विरोधातील 860 पानांचे दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायालय, लातूर येथे दाखल करण्यात आले असून तपास अधिक सखोल करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली; उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबराव नरवाडे, पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपासामध्ये सपोनि बाळासाहेब डोंगरे, सपोनि सदानंद भुजबळ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे सहकार्य लाभले.
