Maharashtra today news
Election news जिल्हा परिषद गट सुपा : रूपाली सचिन लडकत अपक्ष उमेदवार; ताईंच्या बाजूने वारे, ग्रामस्थांमध्ये निवडून येण्याची ठाम चर्चा
बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद गट सुपा येथून सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या रूपाली सचिन लडकत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण गटात राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसून येत असून, सध्या ताईंच्या बाजूने वारे वाहत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.
त्या तुळजाभवानी महिला नवरात्र उत्सव कमिटीच्या अध्यक्षा म्हणून महिलांना संघटित करत धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवत आहेत.. याचबरोबर त्यांनी पाच महिला बचत गटांची स्थापना करून सुमारे १०० महिलांना एकत्र आणले आहे. या बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी नियमित बचत, स्वयंरोजगार आणि आर्थिक व्यवहार सुरू केले असून, आज या बचत गटांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. त्यामुळे अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असून कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
तसेच त्या महिला दक्षता कमिटी, शेरेवाडीच्या सदस्य म्हणून महिलांच्या सुरक्षितता, हक्क व समस्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. महिलांच्या प्रश्नांवर थेट मैदानात उतरून काम करणारी नेतृत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
गावागावात प्रत्यक्ष भेटी, थेट संवाद, समस्या ऐकून घेऊन त्या मार्गी लावण्याची कार्यपद्धती आणि प्रशासनाशी समन्वय साधण्याची क्षमता यामुळे त्यांचा जनसंपर्क दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. कोणत्याही पक्षाच्या दबावाशिवाय अपक्ष उमेदवार म्हणून स्वच्छ, पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, “ताई आपल्या हक्काची निवडून येणारच”, “या वेळेला १०० टक्के गॅरंटी आहे”, अशी चर्चा सध्या जिल्हा परिषद गट सुपा मधील गावागावांत ऐकायला मिळत आहे. त्यांच्या कामाचा अनुभव, महिलांमधील लोकप्रियता आणि सर्वसामान्यांशी असलेली जवळीक पाहता ग्रामस्थांमध्ये त्यांच्या विजयाबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे, असे स्थानिक जाणकार सांगतात.
त्यांच्या कार्याला पाठींबा देणारे त्यांचे पती सचिन दत्तात्रय लडकत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) ओबीसी विभागाचे अध्यक्ष असून सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय आहेत. तसेच ते बारामती नर्सरी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून शेतकरी व नर्सरी व्यावसायिकांच्या प्रश्नांसाठी अनेक उपक्रम राबवत आहेत. त्यांचा भक्कम जनसंपर्क आणि समाजकार्याची पार्श्वभूमी ही रूपाली लडकत यांच्या उमेदवारीस पूरक ठरत असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद गट सुपा मधील सर्वांगीण विकास, महिलांचे सशक्तीकरण, युवकांना संधी, शेतकरी व कामगारांचे प्रश्न, आरोग्य-शिक्षण सुविधा आणि प्रशासनात पारदर्शकता या मुद्द्यांवर आधारित ठोस अजेंडा घेऊन रूपाली सचिन लडकत निवडणूक रिंगणात उतरल्या असून,
“जनता मायबापच अंतिम निर्णय देईल आणि तो आमच्या बाजूने असेल”, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


