अमोल धेंडे प्रतिनिधी
सुपे | MDR 61 रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामामुळे सुपे गावातील पिण्याच्या पाण्याची मुख्य पाइपलाईन तुटली असून, गाव अक्षरशः तहानले आहे.
या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. रस्ता किती मीटरचा होणार, कसा होणार, ड्रेनेज कुठून जाणार याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विचारले असता, “आमच्याकडे याची कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही” असा धक्कादायक खुलासा अधिकाऱ्यांनी केला आहे.
आराखडा न देता, ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता काम सुरू केल्याने गावाची पाणीपुरवठा व्यवस्था उद्ध्वस्त झाली असून, पिणे-अंघोळ-स्वयंपाकासाठीही पाणी नाही. 15 दिवस उलटूनही प्रशासन आणि ठेकेदार ढिम्म आहेत.
“रस्ता करा, पण आधी पाणी द्या!” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तात्काळ पाइपलाईन दुरुस्ती व पर्यायी पाणीपुरवठा न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
---