Maharashtra today news
Crime news पिंपळगावात विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा
प्रतिनिधी राम कांबळे,,,
दौंड : पिंपळगाव (ता. दौंड) येथे २४ वर्षीय विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह तिघांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पायल विशाल जाधव (वय २४, रा. पिंपळगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल हिला सन २०२३ पासून वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप तिच्या आईने फिर्यादीत केला आहे. हा त्रास असह्य झाल्याने पायलने २९ सप्टेंबर २०२६ रोजी पिंपळगाव परिसरातील विहिरीत उडी घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पायलची आई पूजा हनुमंत माने यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती विशाल बबन जाधव, तसेच बानुबाई मनोहर जाधव (मावस सासू) आणि मनोहर जाधव (मावस सासरे, पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. पिंपळगाव, ता. दौंड, जि. पुणे, यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 999/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 108, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत. पुढील तपास सुरू आहे.
