महाराष्ट्र टुडे न्यूज,,,
Cirme news/ Local News चौफुला-सुपा घाटात एसटीचा अपघात; १८ विद्यार्थ्यांसह अनेक जखमी
प्रतिनिधी राम कांबळे,,
दौंड: चौफुला ते सुपा मार्गावरील घाटात एसटी बसचा अपघात होऊन बस दोन ते तीन पलट्या घेत दरीत कोसळल्याची घटना बुधवार, १६ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ वाजता घडली. या अपघातात बसमधील विद्यार्थ्यांसह अनेक जण जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापत झाल्याची माहिती पोलिस नोंदीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच २० बीसी ३१२१ क्रमांकाची एसटी बस चौफुला येथून सुप्याच्या दिशेने घाटातून जात होती. यावेळी बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस मागे उताराला जाऊन दरीत कोसळली. बसने दोन ते तीन पलट्या घेतल्याचे नोंदविण्यात आले आहे.
अपघातात फिर्यादी आर्या इंद्रभान शितोळे (वय १५) यांच्यासह विराज शितोळे, श्री टिळेकर, वेदांत शितोळे, रिंयाश लाड, ऐश्वर्या पितळीया, रोहित पितळीया, शुवांश शितोळे, स्वरा शितोळे यांच्यासह इतर नऊ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १३४, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस चालक राहुल त्रिंबक मडावी याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
घटनेचा पुढील तपास सपोनि कदम करीत आहेत.
यवत, दौंड, चौफुला, सुपा, एसटी बस अपघात, एसटी बस, बस अपघात, दरीत बस कोसळली, विद्यार्थी जखमी, विद्यार्थ्यांचा अपघात, पुणे जिल्हा, यवत पोलीस, चौफुला-सुपा घाट, महाराष्ट्र एसटी, अपघाताची बातमी, पुणे ब्रेकिंग न्यूज, स्थानिक बातम्या
