ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

११ लाखांचा प्रतिबंधित गुटखा-तंबाखूजन्य माल जप्त. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांची धडक कारवाई.*




Maharashtra today news

११ लाखांचा प्रतिबंधित गुटखा-तंबाखूजन्य माल जप्त. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांची धडक कारवाई.*


शिरूर अनंतपाळ पोलिसांची कारवाई; TATA ACE टेम्पोसह ११,०३,६४०/- चा मुद्देमाल जप्त

 महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांनी पोलीस स्टेशन शिरूर आनंतपाळ येथील पोलीस स्टाफसह धडक कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला TATA ACE टेम्पो, असा एकूण ₹११,०३,६४०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


                 दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.०० वाजता मौजे आरीमोड येथील नळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी संशयास्पद वाहनाची तपासणी केली. यावेळी शेख खामरोद्दीन बशीर (वय २९ वर्षे, रा. रेणापूर, जि. लातूर) याच्या ताब्यातील बदामी रंगाचा TATA ACE टेम्पो क्र. MH-13-CJ-0536 यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.


               पोलिसांनी केलेल्या कारवाईत विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू,रजनीगंधा सुगंधित पान मसाला,प्रिमियम रत्ना ब्रँड तंबाखू असा एकूण ८,८८,६४०/- व २,१५,०००/-रुपये किमतीचा TATA ACE टेम्पो असा एकूण ११,०३,६४०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


        या प्रकरणी फिर्यादी पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ पोलीस ठाणे गु.र.नं. १८९/२०२६, कलम १२३, २२३, २७४, २७५ भा.न्या.सं. सहकलम ५९ अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


         प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांना प्रशिक्षणाचा भाग म्हणून श्री अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर यांनी पोलीस स्टेशन शिरूर अनंतपाळ येथे तीन महिन्याचा चार्ज दिलेला आहे. दिनांक 13/08/2026 पासून त्यांनी पोलीस स्टेशनचा चार्ज स्वीकारलेला आहे. श्री अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या त्यांचा प्रशिक्षण कालावधी चालू आहे., गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि रायबोळे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |