कर्मवीर विद्यालय आढले बुद्रुक येथे प्रवचन रुपी सेवा संपन्ऩ़़़़
मावळ प्रतिनिधी :संजय गायकवाड,,
संत साहित्याने परिपूर्ण अशा मावळ तालुक्यामध्ये राम कृष्ण हरी चा जागर करत सांप्रदायरुपी संत विचारांचा मार्ग दाखवत प्रवचन रूपी सेवा करत वैभवशाली महाराष्ट्र साहित्य व संस्कृतीचा अनोखा संगम साधत गरुड पुराणवाचक हभप भाऊसाहेब कराळे यांची प्रवचन रूपी सेवा संपन्न झाली त्यांच्या या सेवाभावी विचारांना विद्यार्थ्यांनी साथ दिली याच संत विचाराने मावळची भुमी पावन झाली सर्वांनीच अशा विचारांना दाद दिली ़ महाराष्ट्राची खरी परंपरा व अस्मिता जपत वैभवशाली महाराष्ट्र जगात किती महान आहे याची अनेक उदाहरणे देऊन विचारच माणसाला जिवंत ठेवू शकतात हेच विचार संपूर्ण जगाला तारू शकतात हे विश्वचि माझे घर अशा विचारांचा संत विचाराने देश करूया पुन्हा सुंदर आपण आपली संस्कृती विसरत चाललो ती आपण आत्मसात केली पाहिजे जोपासली पाहिजे वागले पाहिजे संत विचारातून पिढी घडली पाहिजे संतांचे ग्रंथांचे वाचन करून जीवनाचे हित साधणे झाकलेला इतिहासातील पुन्हा वाचून विद्यार्थ्यांना खरी प्रेरणा मिळावी संत विचारातून देशाची खरी घडी बसावी अशा अनेक विचार प्रबोधन करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आई वडील हेच आपले प्रथम गुरु असून त्यांची मनापासून सेवा करणे नित्यनेमाने त्यांचे दर्शन घेणे गुरुजनांचा मान राखणे आपले विचार मांडून देशभक्तीचे दर्शन घडविण्यात आले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुल्ला सलमा दिलावर ज्येष्ठ शिक्षक सुशील कुमार कांबळे मनोज पवार हसन शिकलगार कविवर्य विठ्ठल दळवी स्वाती कुलकर्णी मुकुंद वाघमारे अदि उपस्थित होते
