ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तीन गावठी पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे व बलेनो कारसह तीन आरोपी जेरबंद

 
Maharashtra today news


यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; तीन गावठी पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे व बलेनो कारसह तीन आरोपी जेरबंद

भांडगाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; ५ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी | दौंड राम कांबळे
पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने भांडगाव (ता. दौंड) परिसरात धाडसी कारवाई करत तीन आरोपींना अवैधरित्या बाळगलेल्या तीन गावठी पिस्तुलांसह १५ जिवंत काडतुसे आणि बलेनो कारसह ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण ५,३७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशानुसार आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध अग्निशस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत ७ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, भांडगाव परिसरात नंबर नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमधून तीन इसम अवैध गावठी पिस्तुलांसह फिरत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीस स्टेशनच्या पथकाने सोनाक्षी मंगल कार्यालयासमोरील परिसरात सापळा रचून संशयित कार अडवली. कारमधील मंगेश शंकर मासोळे (२४), सुरज संजय शेलार (२६) आणि रोहित प्रेमदास भुजवणे (२४), सर्व रा. यवत, ता. दौंड यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे आणि बलेनो कार असा ५,३७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यवत पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ६९२/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही शस्त्रे कोठून आणली आणि त्यांचा वापर कशासाठी होणार होता, याचा पुढील तपास सुरू आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

**सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापूराव दडस, दौंड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश डोंगरे, पोलीस अंमलदार श्री. सचिन घाडगे, श्री. आसिफ शेख, श्री. तुषार पंदारे, श्री. जनार्दन शेळके, श्री. संजू जाधव, श्री. राजू मोमीन, श्री. विकास पाटील, श्री. गुरुनाथ गायकवाड, श्री. सुभाष राऊत, श्री. योगेश नागरगोजे, श्री. विकास कापरे, तसेच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार श्री. संदीप देवकर यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |