ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

लोणीकंद पोलिसांची अमली पदार्थांविरोधात जनजागृती मोहीम; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

 


Maharashtra today news

लोणीकंद पोलिसांची अमली पदार्थांविरोधात जनजागृती मोहीम; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

लोणीकंद (पुणे) : वाढत्या अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनने जनजागृतीची व्यापक मोहीम सुरू केली आहे. परिसरातील प्रत्येक नागरिकाने अमली पदार्थांविरोधातील या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनीता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत युवक, विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगितले जात आहेत. संशयास्पद हालचाली, अमली पदार्थांची विक्री किंवा सेवन होत असल्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी "आपली सुरक्षा – आपली जबाबदारी – आपले लोणीकंद" हा संदेश देत व्यसनमुक्त आणि गुन्हेमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

लोणीकंद पोलीस स्टेशनने स्पष्ट केले आहे की, अमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

"व्यसनाला नकार... सुरक्षित भविष्यास होकार!" या संदेशासह लोणीकंद पोलिसांनी सुरू केलेल्या या जनजागृती मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अमली पदार्थमुक्त लोणीकंद घडविण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |