ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Crime newsरस्त्यात अडवून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी केले जेरबंद

 


Maharashtra today news,

Crime newsरस्त्यात अडवून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी केले जेरबंद

पुणे, प्रतिनिधी : रिक्षाचालकाला रस्त्यात अडवून मारहाण करत मोबाईल, रोख रक्कम आणि रिक्षा जबरदस्तीने पळवून नेणाऱ्या आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी चतुराईने ताब्यात घेत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १२ जून २०२६ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास गुरुगौतम मुनी हॉस्पिटलसमोर, बिबवेवाडी येथे फिर्यादी सिद्धेश्वर नरहरी मुंढे (वय १९, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) हे रिक्षातून जात असताना दोन पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांची रिक्षा अडवली. आरोपींनी त्यांना जबरदस्तीने रिक्षाबाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्यांच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम तसेच रिक्षा घेऊन पलायन केले.

या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(४), १२६(२), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे आणि रक्षित काळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गंगाधाम रोड परिसरातील आईमाता मंदिरामागे सापळा रचून आरोपी किरण एडबा झोंबाडे (वय २०), पंकज सुभाष पवार (वय २१) आणि कुमार बाळकृष्ण खुडे (वय ३०) यांना ताब्यात घेतले.

अधिक चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करून पंचासमक्ष जप्त केला आहे. अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सूरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |