ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Crime news नेरूळमध्ये 10 लाखांचा टाटा ट्रक चोरीला



Maharashtra today news

प्रतिनिधी,,, मुरलीधर नाईक नवरे

Crime news नेरूळमध्ये 10 लाखांचा टाटा ट्रक चोरीला

नवी मुंबई : नेरूळ परिसरातून रोडच्या कडेला पार्क केलेला टाटा कंपनीचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रतन सुखदेव घोलप (वय 59, रा. नेरूळ, नवी मुंबई) हे ट्रक चालक असून ट्रक चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे टाटा कंपनीचा MH 43 BP 2699 क्रमांकाचा ट्रक आहे. त्यांनी दिनांक 03 मे 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सेक्टर 08, आंबेडकर ब्रिजजवळ रोडच्या कडेला सदर ट्रक पार्क करून ठेवला होता.

मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे 04 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास व्यवसायासाठी ट्रक घेण्यासाठी गेले असता ट्रक जागेवर दिसून आला नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र ट्रक कुठेही आढळून आला नाही. अखेर अज्ञात चोरट्यांनी ट्रक चोरी केल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

चोरी झालेला ट्रक टाटा 709 कंपनीचा असून त्याचा रंग मरून व नारंगी आहे. सदर ट्रकची अंदाजे किंमत 10 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |