ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Crime newsप्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या ६ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; फरार आरोपीला अखेर अटक

 


Maharashtra today news

Crime newsप्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या ६ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; फरार आरोपीला अखेर अटक

📍 पुणे | प्रतिनिधी

प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एका ६ वर्षीय निष्पाप मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील फरार आरोपीस दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अथक परिश्रम करून अखेर अटक केली आहे.

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), २३८, ६१(२), ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी बसरिन मेहबुब शेख (वय २७, रा. पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) हिचे राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते.



माहितीनुसार, बसरिन शेख ही विवाहित असून तिला तीन मुले आहेत. ती चार महिन्यांपूर्वी तिच्या प्रियकरासोबत कुरुळी (ता. खेड, जि. पुणे) येथे राहण्यासाठी आली होती. तिचा ६ वर्षीय मुलगा आवेज हा त्यांच्या संबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून त्याचा खून करण्याचा कट रचला.

४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी आवेजला बाथरूममध्ये नेऊन पाण्याच्या बादलीत डोके बुडवून तसेच भिंतीवर आणि जमिनीवर आपटून अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव करण्यात आला.

यानंतर आरोपींनी मृतदेह इर्टिगा कारमधून धर्मापुरी (ता. परळी, जि. बीड) येथे नेला. मात्र, मुलाचे वडील इसाक शेख यांना संशय आल्याने त्यांनी परळी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. शवविच्छेदन अहवालात मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्याने पोलिसांनी बसरिन शेख हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणात बसरिन शेख हिला यापूर्वीच अटक करण्यात आली होती, तर तिचा प्रियकर राम कजेवाड हा फरार होता. पोलिसांनी तिरुपती (आंध्र प्रदेश) आणि अंबाजोगाई (जि. बीड) येथे शोधमोहीम राबवून अखेर १७ एप्रिल २०२६ रोजी त्याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री. सारंग अव्हाड, श्री. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |