ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Crime crime लोणीकंद पोलीसांची धडक कारवाई; १३ हजार लिटरहून अधिक हातभट्टी दारू जप्त

 


Crime crime लोणीकंद पोलीसांची धडक कारवाई; १३ हजार लिटरहून अधिक हातभट्टी दारू जप्त

लोणीकंद पोलीसांनी हिंगणगाव परिसरात धडक कारवाई करत अवैध हातभट्टी उद्ध्वस्त करत मोठ्या प्रमाणावर गावठी दारू व साहित्य जप्त केले आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या “फ्लश आऊट ऑपरेशन” अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून अवैध दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.



पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे (परिमंडळ ७) यांच्या आदेशानुसार व सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पथकाने १३ एप्रिल २०२६ रोजी हिंगणगाव (ता. हवेली) येथील जंगल परिसरात छापा टाकला. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

या छाप्यात पोलीस रेकॉर्डवरील आरोपी सचिन मकनसिंग नानावत (वय २७, रा. आष्टापुर फाटा, पुणे) हा हातभट्टीद्वारे गावठी दारू तयार करत असल्याचे समोर आले. पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान पोलिसांना अंदाजे १३,५०० लिटर कच्चे रसायन व ६,७०० लिटर तयार गावठी दारू सापडली. तसेच हातभट्टीसाठी वापरण्यात येणारी लोखंडी भांडी, प्लास्टिक टाक्या, कॅन व सरपण असा एकूण सुमारे १३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे करत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे व त्यांच्या पथकातील स्वप्नील जाधव, कैलास साळुंके, सागर जगताप, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, सुधीर शिवले, दिनेश मरकड, किसन मांदळे व महिला पोलीस अंमलदार काळाने यांनी यशस्वीपणे पार पाडली.

या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा आळा बसला असून नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |