ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Jayanti Special)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चौफुला इंदिरानगरमध्ये उत्साहात कार्यक्रम

 


Maharashtra today news

(Jayanti Special)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चौफुला इंदिरानगरमध्ये उत्साहात कार्यक्रम

चौफुला, इंदिरानगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसरात सामाजिक एकतेचा आणि प्रेरणेचा संदेश देण्यात आला.



या कार्यक्रमानंतर संध्याकाळी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहभोजनात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा समाजावर होणारा सकारात्मक परिणाम यावर आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाला अभिषेक दादा थोरात, रघुनाथ सरगर, विलास कोळपे, बाळासाहेब सोडणवर, सुनील सोडणवर, राजू शेठ कोळपे, योगेश कोळपे, विष्णु लोंढे, रफिक मुल्ला, दादा गडधे, सुजित शेंडगे, विकास सोडणवर, सागर धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवक मंचाचे अध्यक्ष राम भोसले, उपाध्यक्ष प्रकाश लोंढे, खजिनदार नवनाथ शेलार यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते उद्धव गायकवाड, विनोद उदागे, महावीर कांबळे, निलेश कांबळे, श्रावण भोसले, महावीर भोसले, नितीन पोळ, माऊली भोसले, जितीन गावडे, सनी वैरागर, प्रवीण भोसले, लखन बगाडे, यशवंत कांबळे, तात्या बोडरे, दादा शेंडगे, दिपक शिंदे, हनुमंत पाळेकर, अभिषेक कांबळे, आकाश पोळ, नागेश कांबळे, अभिमान चंदनशिवे, धनंजय मखरे (SBM), राहुल मखरे, कुमार गायकवाड, कपिल भोसले, बंटी गायकवाड, कार्तिक शिरवाळे, बाप्पू पोळ, चिक्या खरात, गणेश पालवे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि न्याय या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |