ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Crime newsओन्ली किंग ऑफ पुणे’ म्हणत रॅली; तडीपार आरोपींची पोलिसांकडून मस्ती जिरवली


Maharashtra today news


 Crime newsओन्ली किंग ऑफ पुणे’ म्हणत रॅली; तडीपार आरोपींची पोलिसांकडून मस्ती जिरवली

पुणे : सोशल मीडियावर दहशतीचे व्हिडिओ रिल्स टाकत ‘ओन्ली किंग ऑफ पुणे’ अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तडीपार आरोपीवर खराडी पोलिसांनी कडक कारवाई करत त्याची मस्ती जिरवली. या प्रकरणात मुख्य आरोपीसह चौघांना अटक करण्यात आली असून इतर ८ ते १० अज्ञात साथीदारांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर, येरवडा येथील सराईत गुन्हेगार निखील मधुकर कांबळे (वय २३) याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, आदेशाचे उल्लंघन करत त्याने दि. २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते १० वाजण्याच्या दरम्यान खराडी येथील रक्षक नगर गोल्ड सोसायटी परिसरात साथीदारांसह बेकायदेशीर जमाव जमवला. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने या जमावाने रॅली काढली आणि त्याचे व्हिडिओ ‘nk_company_munjabawasti_pune_15’ या इंस्टाग्राम अकाउंटवरून प्रसारित केले.

या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १८९ (१) (२), १९० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७ (१) (३), १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक आरोपी:

निखील मधुकर कांबळे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा)

सुरेश रुपेश गायकवाड (रा. सुभाषनगर, येरवडा)

अनुज नितीन मोरे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा)

ओमकार अनिल चावरे (वय २४)

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांनी ज्या परिसरात बेकायदेशीर जमाव जमवला होता, त्या ठिकाणी नेऊन स्थानिक नागरिकांसमोर त्यांची फेरी काढली. यामागील उद्देश गुन्हेगारीचे उदात्तीकरण रोखणे आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालणे हा होता. या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारीला थारा नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ७) सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (खराडी विभाग) प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, महिला उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे तसेच पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, दत्तात्रय खरपुडे, महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, साहेबराव गुंडाळे, श्रीकांत कोंद्रे, विकास केदार आणि उज्ज्वला थोरात यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |