ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Thane Police ई-गव्हर्नन्समध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाचा राज्यात द्वितीय क्रमांक; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

 


Maharashtra today news

Thane Police ई-गव्हर्नन्समध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाचा राज्यात द्वितीय क्रमांक; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

मुंबई, दि. १६ फेब्रुवारी २०२६ – महाराष्ट्र शासनाच्या “150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रम” अंतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये संकेतस्थळांची कार्यक्षमता, “जाणते सरकार” प्रणालीचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) यांसारख्या घटकांवर सविस्तर आढावा घेण्यात आला.



या मूल्यमापनात ठाणे पोलीस आयुक्तालय यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे पोलीस दलात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आशुतोष डुंबरे, पोलीसआयुक्त, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदारांनी ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकाभिमुख सेवा अधिक सक्षम, जलद व पारदर्शक करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या एकत्रित परिश्रम, उत्कृष्ट समन्वय व कार्यनिष्ठेमुळेच ही कामगिरी शक्य झाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, “ही कामगिरी आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची व समाधानाची बाब आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि एकजुटीच्या बळावर हे यश मिळाले आहे. नागरिकाभिमुख सेवा अधिक सक्षम व पारदर्शक करण्यासाठी केलेले प्रयत्न विशेष कौतुकास्पद आहेत,” अशा भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

तसेच, या यशामध्ये प्रत्येक अधिकारी व अंमलदार यांचा मोलाचा सहभाग असून, ही कामगिरी त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रतीक असल्याचेही नमूद करण्यात आले. भविष्यातही अशाच समर्पित भावनेने कार्य करत अधिक उंची गाठावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येत असून, या कार्यक्रमास देवेंद्र फडणवीस व सुनेत्रा अजित पवार एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |