ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Crime newsपोलीस ठाणे ढोकी – घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक; चार गुन्ह्यांचा पर्दाफाश

 


Maharashtra today news,

Crime newsपोलीस ठाणे ढोकी – घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक; चार गुन्ह्यांचा पर्दाफाश

ढोकी पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत पोलिसांनी एका आरोपीस अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दिनांक 06/05/2026 रोजी पोलीस ठाणे ढोकीचे प्रभारी अधिकारी सपोनि विलास हजारे हे पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गु.र.नं. 143/2026 कलम 305(A) BNS अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी विकी सजगिरा शिंदे, कृष्णा श्रावण शिंदे व अजय श्रावण शिंदे हे कोंड, सुंभा परिसरात फिरत आहेत.

माहिती मिळताच सपोनि विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि माळी, ग्रेड पोउपनि सातपुते, पोलीस हवालदार बागवान, मपोना रोकडे तसेच पोलीस अंमलदार महेश शिंदे, नवनाथ खांडेकर व लक्ष्मण शिंदे यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपींचा शोध सुरू केला.

कारवाईदरम्यान आरोपी विकी सजगिरा शिंदे यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या झडतीत 39,000 रुपये रोख रक्कम व सुमारे 20 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. इतर दोन आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

अधिक चौकशीत आरोपीने पोलीस ठाणे ढोकी हद्दीतील चार घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत:

गु.र.नं. 46/2026 – कलम 30(A) BNS

गु.र.नं. 55/2026 – कलम 331(4), 305(A) BNS

गु.र.नं. 124/2026 – कलम 305(B) BNS

गु.र.नं. 143/2026 – कलम 305(A) BNS

सदर गुन्ह्याचा पुढील तपास व उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे

सदर कामगिरी मा. श्रीमती रितु खोखर पोलीस अधिक्षक, मा शफकत आमना अपर पोलीस अधिक्षक, संजय पवार मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो कळंब यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विलास हजारे, पोउपनि माळी, ग्रेड पोउपनि सातपुते, पोलीस हवालदार बागवान,, मपोना रोकडे, पोलीस अंमलदार महेश शिंदे, नवनाथ खांडेकर, लक्ष्मण शिंदे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |