ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Thane crime news ठाण्यात अनैतिक रॅकेटचा पर्दाफाश; मनोरंजन क्षेत्राशी संबंधित महिला अटकेत दोन तरुणींची सुटका; जादा मानधनाच्या आमिषाने फसवणुकीचा आरोप


Maharashtra today news,,,

Thane crime news ठाण्यात अनैतिक रॅकेटचा पर्दाफाश; मनोरंजन क्षेत्राशी संबंधित महिला अटकेत दोन तरुणींची सुटका; जादा मानधनाच्या आमिषाने फसवणुकीचा आरोप

ठाणे, प्रतिनिधी :

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने कारवाई करत शहरातील कथित अनैतिक रॅकेट उघड केले. या प्रकरणात मनोरंजन क्षेत्राशी संबंधित 27 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.



पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नवोदित कलाकारांना मालिका, मॉडेलिंग तसेच डिजिटल माध्यमांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात होते. जादा मानधन आणि प्रसिद्धीच्या नावाखाली त्यांना गैरप्रकारात अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे.

सहायक पोलीस आयुक्त रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे, उपनिरीक्षक स्नेहल शिंदे आणि त्यांच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचत संशयित महिलेला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत डिजिटल माध्यमांचा वापर करून संपर्क साधला जात असल्याचे समोर आले आहे.

संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |