ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Rajkaranराज्यस्तरीय स्पर्धेत काल्हेर ग्रामपंचायतीची दमदार कामगिरी; कोटींचा निधी जिंकला


राज्यस्तरीय स्पर्धेत काल्हेर ग्रामपंचायतीची दमदार कामगिरी; कोटींचा निधी जिंकला

सुजाता सरेकर,,,,,

काल्हेर (प्रतिनिधी) – राज्यस्तरीय ग्रामपंचायत गट (१० हजार पेक्षा अधिक लोकसंख्या) स्पर्धेत काल्हेर ग्रामपंचायतने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ग्रामपंचायतीला रु. १.७५ कोटी (एक कोटी पंच्याहत्तर लक्ष रुपये) इतक्या भरीव बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे


या गटात बोरगाव ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक मिळवत रु. १.५० कोटी, तर कासेगाव ग्रामपंचायतने तृतीय क्रमांक मिळवत रु. १.२५ कोटी बक्षीस पटकावले. या गटासाठी एकूण रु. ४.५० कोटींचा निधी वितरित करण्यात आला.



याशिवाय ‘भूमी थीमॅटीक’ अंतर्गत उच्चत्तम कामगिरीबद्दल काल्हेर ग्रामपंचायतीला ‘उंच उडी (High Jump)’ या विशेष श्रेणीत रु. ७५ लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. तसेच दुर्गापुर ग्रामपंचायतीलाही स्वतंत्र श्रेणीत रु. ५० लाखांचा पुरस्कार मिळाला आहे.

काल्हेर ग्रामपंचायतीच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या निधीतून पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा व विकासकामांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


ग्रामपंचायतीच्या या यशस्वी कामगिरीमुळे जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |