ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Thane crime newsऑनलाईन जोडीदाराच्या शोधात तरुण लुबाडला; ठाण्यात ३४ लाखांचा सायबर घोटाळा



Thane crime newsऑनलाईन जोडीदाराच्या शोधात तरुण लुबाडला; ठाण्यात ३४ लाखांचा सायबर घोटाळा


 ठाणे : मॅट्रिमोनियल ओळखीच्या माध्यमातून ३० वर्षीय तरुणाची ३४ लाखांची फसवणूक; क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष ठाणे शहरात ऑनलाईन मॅट्रिमोनियल संकेतस्थळावरील ओळखीच्या माध्यमातून एका ३० वर्षीय तरुणाची तब्बल ३४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

तक्रारदार तरुण हा मूळचा बिहार राज्यातील असून नोकरीनिमित्त ठाण्यातील माजिवडा परिसरात मित्रासोबत भाडेतत्त्वावर वास्तव्यास आहे. विवाहासाठी जोडीदाराच्या शोधात असताना त्याने एका ऑनलाईन मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर नोंदणी केली होती. डिसेंबर २०२५ मध्ये एका तरुणीने त्याची रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाल्यानंतर संबंधित तरुणीने त्याला क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले.

व्हॉट्सअॅपद्वारे पाठवलेल्या लिंकवरून ट्रेडिंग केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगत तिने बनावट नफ्याचे स्क्रीनशॉट पाठवून विश्वास संपादन केला. सुरुवातीला तरुणाने ५० हजार रुपये वॉलेटमध्ये जमा करून २० हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर नफा झाल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले आणि टप्प्याटप्प्याने त्याच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले.

क्रिप्टो चलन भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली पुन्हा रक्कम मागण्यात आली. संशय आल्याने तरुणाने संबंधित संकेतस्थळ तपासले असता ते बंद असल्याचे आढळले. तरुणीचा मोबाईल क्रमांकही बंद होता व तिचे मॅट्रिमोनियल प्रोफाईल पडताळणीअंतर्गत दाखवले जात होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने १९३० या सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली.

तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात ३४ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून संबंधित बँक व्यवहार व डिजिटल पुराव्यांचा तपास केला जात आहे. ऑनलाईन ओळखीच्या माध्यमातून गुंतवणुकीचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तींविषयी नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |