ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Crime newsओळख लपवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी बिबवेवाडी पोलीसांच्या कचाट्यात



Maharashtra today news

 Crime newsओळख लपवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी बिबवेवाडी पोलीसांच्या कचाट्यात


पुणे, दि. ११ (प्रतिनिधी): ओळख लपवून धारदार शस्त्राने हल्ला करत एका व्यक्तीचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सोमसिंह मानसिंह जोधा राठोड (वय ४३, व्यवसाय – सराफ), रा. सुखसागर नगर, कात्रज, पुणे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दि. २७ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास महाराणी साडी दुकानाजवळ, गल्ली क्र. २, सुखसागर नगर येथे पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या अॅक्टीव्हा मोपेडवरून आलेल्या तिघा अनोळखी इसमांनी त्यांच्या भावावर जीवघेणा हल्ला केला.

हल्लेखोरांनी डोक्यावर कॅप घालून ओळख लपवली होती. त्यापैकी दोघांनी धारदार शस्त्राने भरतसिंह मानसिंह जोधा राठोड (वय ४१) यांच्या डोक्यावर व दोन्ही हातांवर वार केले, तर तिसऱ्या इसमाने लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांना शस्त्र फिरवून “मध्ये आलात तर ठार मारू” अशी धमकी देत दहशत निर्माण केली. आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढताना दुकानावर दगडफेकही केली.

या घटनेप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१), ३५१(४), ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ तसेच क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांचे आदेशाने तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल भुवड, तसचे तपास पथकातील पोलीस हवालदार संजय गायकवाड, विनोद जाधव, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, शिवाजी येवले, विशाल जाधव, आशिष गायकवाड, रक्षित काळे, ज्योतिष काळे असे दाखल गुन्ह्यतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असताना सुमित ताकपेरे, विशाल जाधव यांना त्यांचे गुप्त बातमिदारामार्फत माहिती मिळाली की. दाखल गुन्ह्यातील पाहीज आरोपी '१) अभिषेक तुळजाराम क्षीरसागर, वय २१ वर्षे, व्यवसाय पेटींग, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, गल्ली नं.५, घर क्र. ४. अप्पर, बिबवेवाडी, पुणे, २) ओंकार अनील शिंदे, वय २३ वर्षे, रा. स.न. ६३१, ओंकार नगर, अब्दुल चिकन सेंटर, बिबवेवाडी, पुणे, ३) आशीष रमेश शिंदे, वय २० वर्षे, रा. दत्तकृपा बिल्डींग, फ्लॅट नं ०२, लेन नं. ०४, पी एम टी कॉलणी, अप्पर बिबवेवाडी, पुणे. असे असून अनु.क्र. ०१ व ०२ सध्या दत्तवाडी, पुणे येथे असून अनु.क्र. ०३ हा त्याचे राहाते घरी आहे." वगैरे मजकुरची माहिती मिळाल्याने लागलीच मा. वरिष्ठांचे आदेशाने तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी वर नमुद आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास करता त्यांनी दाखल गुन्हा केलेचे कबूल केलेने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांधी प्रथम पोलीस कोठडी व नंतर मा. न्यायालयीन कोठडी मंजूर करून त्यांना येरवडा कारागृहात रवाना केले आहे. तसेच दाखल गुन्ह्यातील ऊर्वरीत तीन आरोपीतांचा शोध घेवून त्यांना अटक करणेची तजवीज ठेवली आहे.


सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सो, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते, परिमंडळ २ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राहूल आवारे, भारती विद्यापीठ विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली बरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल भुवड, पोलीस हवालदार संजय गायकवाड, विनोद जाधव, संतोष जाधव, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, विशाल जाधव, रक्षित काळे, शिवाजी येवले, ज्योतिष काळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |