ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Crime newsन्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बनावट पेमेंट स्लिपचा पर्दाफाश

 


Maharashtra today news

Crime newsन्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बनावट पेमेंट स्लिपचा पर्दाफाश

Crime Newsखोटी बनावट पेमेंट स्लिपद्वारे न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या आरोपीस शिवाजीनगर पोलिसांनी केले गजाआड

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात श्री. अरविंद ललित सोमाणी (रा. खडकवासला, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खोटी बनावट पेमेंट स्लिप सादर करून न्यायालयाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी गणेश अजिनाथ बोराटे (रा. कोंढवे धावडे, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर मा. न्यायालयाने वॉरंट काढलेले असताना, दुमास इंडस्ट्रीज, शेड नं. १, नवले इंडस्ट्रियल इस्टेट, न-हे, पुणे या कंपनीच्या नावाने जामीनदार म्हणून विक्रम भिमाजी धोंडगे (रा. कोंढवे धावडे, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या नावाची खोटी बनावट पेमेंट स्लिप सादर करण्यात आली.


आरोपी

या प्रकारात आरोपी गणेश अजिनाथ बोराटे व त्याचा साथीदार विक्रम भिमाजी धोंडगे यांनी संगनमताने फिर्यादी व मा. न्यायालयाची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी तपासादरम्यान सदर बनावट पेमेंट स्लिप ही आरोपी गणेश अजिनाथ बोराटे याने तयार केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास करत असताना, दि. २३/०१/२०२६ रोजी आरोपी विक्रम भिमाजी धोंडगे यास अटक करून गजाआड करण्यात आले आहे.

सध्या सदर आरोपी न्यायालयीन कोठडीत येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे आहे. तसेच बनावट स्लिप तयार करणारा मुख्य आरोपी गणेश अजिनाथ बोराटे याचा शोध शिवाजीनगर पोलीस कसोशीने घेत आहेत.

ही कारवाई मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-१) श्री. कृषीकेश रावले, तसेच तत्कालीन मा. सहा पोलीस आयुक्त श्री. साईनाथ ठोंबरे (विश्रामबाग विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीशकुमार दिघावकर, सहा पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील, तसेच पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, सचिन जाधव, तेजस चोपडे, दीपक चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |