ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Social Awareness त्यागमूर्ती रमाई माता यांची जयंती कशेळी, काल्हेर येथे उत्साहात साजरी




Social Awareness त्यागमूर्ती रमाई माता यांची जयंती कशेळी, काल्हेर येथे उत्साहात साजरी

कशेळी, काल्हेर येथील त्यागमूर्ती रमाई माता यांची जयंती मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन भीम पॅंथर संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर व महिला भगिनींनी रमाई माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


सामाजिक कार्यकर्त्या

या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वक्त्यांनी त्यागमूर्ती रमाई माता यांच्या जीवनकार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. रमाई माता यांनी आयुष्यभर समाजातील वंचित, शोषित व दुर्बल घटकांसाठी संघर्ष केला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीला भक्कम पाठबळ दिले, तसेच महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि समतेचा विचार समाजात रुजवण्यासाठी मोठे योगदान दिले.


त्यागमूर्ती रमाई माता व भीम पॅंथर संघटनेच्या महिला कार्यकर्त्या

रमाई माता या संघर्ष, त्याग आणि सहनशीलतेचे प्रतीक होत्या. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी समाजकार्याची ज्योत अखंड पेटती ठेवली. त्यांच्या जीवनातून नैतिकता, आत्मसन्मान आणि समतेची शिकवण मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या जयंतीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आशिष जाधव आणि सुशील शिंदे यांनी केले.

भीम पॅंथर कार्यकर्ते

या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षिका वनिता कांबळे, प्रज्ञा विरघट, त्यागमूर्ती महिला अध्यक्ष सोनिया गवई, शिल्पा वाकोडे महानायक संपादिका सुजाताई सरेकर, तसेच भीम पॅंथर फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्या, रमाई माता यांच्या विचारांनी प्रेरित अनेक महिला भगिनी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भीम पॅंथर संघटनेचे अध्यक्ष आशिष जाधव, व पत्रकार सुजाताई सरेकर यांचा सत्कार करताना,,

यावेळी उपस्थितांनी रमाई माता यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा व समाजात समता, बंधुता व न्यायाची मूल्ये रुजवण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |