ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Pune crime news स्वामीनारायण मंदिराजवळ शस्त्रसाठा उघड; आंबेगाव पोलिसांनी तरुणास जेरबंद केले

 


Maharashtra today news,

Pune crime news स्वामीनारायण मंदिराजवळ शस्त्रसाठा उघड; आंबेगाव पोलिसांनी तरुणास जेरबंद केले

आंबेगाव (पुणे) :

आंबेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत एका सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करून त्यास जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली.

आंबेगाव पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते व प्रमोद भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, स्वामीनारायण मंदिराजवळील सर्व्हिस रोड, आंबेगाव खुर्द, पुणे येथे एक इसम संशयास्पदरीत्या थांबलेला असून त्याच्याकडे अग्निशस्त्र आहे. सदर माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. वरिष्ठांच्या तोंडी आदेशानुसार खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

त्यानुसार आंबेगाव पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी पथकासह नमूद ठिकाणी सापळा रचून इसम सुयश सोमनाथ घोडके (वय २४ वर्षे, व्यवसाय – शेती, रा. फ्लॅट नं. १७, सिद्धी हाइट्स, अभिनव कॉलेजजवळ, नऱ्हे, पुणे) यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे ४१ हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

यानंतर आरोपीस आंबेगाव पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २७/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस अटक करून मा. न्यायालयाकडून दिनांक २३/०१/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर करीत आहेत.

विशेष म्हणजे, सदर आरोपीविरुद्ध यापूर्वीही वालचंदनगर पोलीस स्टेशन, तालुका इंदापूर, पुणे ग्रामीण येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर मा. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त मा. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक) मा. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ–२ श्री. मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पो.नि. (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे व मपोशि दीक्षा मोरे यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |