ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

PoliticsLocal News,सुपा येथे पत्रकारांवर राजकीय दबाव; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची कथित दमबाजी”


Maharashtra today news,,,

PoliticsLocal News,सुपा येथे पत्रकारांवर राजकीय दबाव; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची कथित दमबाजी”

सुपा येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची कथित दमबाजी

निवडणूक जाहीर होताच माध्यम स्वातंत्र्य धोक्यात?

अमोल धेंडे| प्रतिनिधी

राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच संपूर्ण बारामती तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध पक्षांकडून हालचालींना वेग आला असतानाच सुपा गावात पत्रकारांवर दबाव टाकण्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, माध्यम स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सुपा येथे कार्यरत असलेल्या एका स्थानिक पत्रकाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी थेट जाब विचारल्याचा आरोप आहे. “आमच्या मनाविरुद्ध बातम्या का प्रसिद्ध करता? आम्हाला विचारूनच बातम्या द्यायला हव्यात,” असे म्हणत संबंधित पत्रकारावर मानसिक दबाव टाकण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या राजकीय बातम्यांचा राग मनात धरून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

संयुक्त उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे तापली

बारामती तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार गट या दोन्ही बाजूंनी काही ठिकाणी संयुक्त उमेदवार उभे करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर नाराजी, अंतर्गत मतभेद आणि राजकीय अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर वास्तववादी आणि वस्तुनिष्ठ वृत्तांकन विविध माध्यमांतून प्रसिद्ध होत आहे. मात्र या बातम्यांमुळे काही स्थानिक पुढारी व स्वयंघोषित कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, त्यांनी थेट पत्रकारांवर दबाव तंत्राचा अवलंब केल्याचा आरोप पुढे येत आहे.

लोकशाही व माध्यम स्वातंत्र्यावर घाला,

पत्रकारांना धमकावणे, जाब विचारणे किंवा बातम्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे ही बाब लोकशाही व्यवस्थेला आणि माध्यम स्वातंत्र्याला घातक असल्याचे मत पवित्र बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाने व्यक्त केले आहे. पत्रकार समाजाचे काम केवळ सत्य मांडणे आणि जनतेसमोर वास्तव आणणे हे असून, त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

पत्रकार संघ आक्रमक; आंदोलनाचा इशारा

सुपा येथील घटनेनंतर तालुक्यातील पत्रकार एकवटले असून, यापुढे अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. संबंधित कार्यकर्त्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघाने केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वरिष्ठ नेतृत्वाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा पत्रकार संघटनेच्या वतीने गांधीगिरी मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

पोलीस तक्रारीचा इशारा

या संपूर्ण प्रकरणी पत्रकारांच्या वतीने सामूहिक स्वरूपात सुपा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कायदेशीर मार्गाने न्याय मागितला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक काळात अशा घटना घडल्यास प्रशासनानेही याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |