ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Crime news भिवंडी शहर हादरले; हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा



Maharashtra today news,,,

Crime news भिवंडी शहर हादरले; हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा

भिवंडी | प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ठाणे पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी कक्षाने (Anti-Human Trafficking Cell) केलेल्या धडक कारवाईत एका हॉटेलमध्ये सुरू असलेले सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले असून, या प्रकरणात देहव्यवसाय चालवणाऱ्या महिला एजंटला अटक करण्यात आली आहे. तसेच या कारवाईत दोन महिलांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मुश्रत अन्सार मिर्झा (वय ४०) असून ती मुंबईच्या सांताक्रूझ (पूर्व) येथील रहिवासी आहे. सदर आरोपी महिला तरुण महिलांना आमिष दाखवून देहव्यवसायात ढकलत असल्याचे तसेच त्यांच्याकडून जबरदस्तीने आर्थिक शोषण करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे मानव तस्करी विरोधी कक्षाच्या पथकाने भिवंडी येथील एका हॉटेलवर बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. खात्री झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत घटनास्थळी सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. छाप्यादरम्यान आरोपी महिला एजंटला रंगेहाथ पकडण्यात आले.

या कारवाईत देहव्यवसायासाठी जबरदस्तीने ठेवण्यात आलेल्या दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या टोळीचे जाळे इतर शहरांपर्यंत पसरले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. भिवंडी परिसरात अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |