Maharashtra today news
Politics / State News सर्वपक्षीय शोकसभा: सुपे परगण्यात अजित दादा पवार यांना श्रद्धांजली
बारामती | प्रतिनिधी,, फिरोज मोगल
महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, बारामती तालुक्याचे आमदार व महाराष्ट्राचा लाडका नेता, कामाचा माणूस आदरणीय अजित दादा पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असून, पवार परिवारावर आलेल्या या दुःखातून त्यांना सावरण्याचे बळ पांडुरंग परमात्मा देवो अशी भावपूर्ण श्रद्धांजली सुपे परगण्याच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
बारामती व सुपे परगण्यातील लोकांमध्ये दादांबद्दल अपार प्रेम आणि आदर आहे. त्यांच्या कार्यामुळे प्रत्येक गावकऱ्यांच्या जीवनात फरक पडला आहे आणि त्यांच्या सामाजिक, विकासात्मक उपक्रमांमुळे दादांचे नाव सर्वत्र आदराने घेतले जाते.
याप्रसंगी सुपापरगण्याच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून ती उद्या, दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता, छत्रपती शिवाजी स्मारक, बाजारतळ, सुपा येथे पार पडणार आहे.
सुपे परगण्याच्या वतीने सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, बंधू-भगिनी, युवक आणि आबालवृद्ध यांना आपल्या लाडक्या दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुपे परगण्याने या ऐतिहासिक क्षणी एकत्र येऊन अजित दादा पवार यांच्या कार्याची आठवण, त्यांच्या योगदानाची सन्मानपूर्वक अभिव्यक्ती करण्याची संधी प्रत्येक नागरिकाने घेण्याचे आवाहन केले आहे.
