ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Police Transfersपुणे शहरात २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; पोलीस आयुक्त


Maharashtra today news

 Police Transfersपुणे शहरात २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश

पुणे | प्रतिनिधी

पुणे शहरातील पोलीस प्रशासन अधिक सक्षम व कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने २५ पोलीस निरीक्षक व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले असून, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गुन्हे शाखेतील विविध युनिट व विशेष पथकांमधील पोलीस निरीक्षकांच्या देखील अंतर्गत फेरनियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांची क्रमवार यादी :

1)जयंत राजुरकर – सहकारनगर पोलीस ठाणे (गुन्हे) → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे

२) राघवेंद्रसिंह क्षीरसागर – पोलीस निरीक्षक, कल्याण शाखा → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाणे

३)विनय पाटणकर – पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे

४)मारुती पाटील – पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येवलेवाडी पोलीस ठाणे

५)संतोष खेतमाळस – पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस ठाणे

६)नंदकुमार गायकवाड – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस ठाणे → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस ठाणे

७) मनिषा पाटील – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस ठाणे → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहगाव पोलीस ठाणे

८) विश्वजीत जगताप – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहगाव पोलीस ठाणे → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस ठाणे

९) राजेंद्र सहाणे – पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस ठाणे

१०) महेश बोळकोटगी – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे

११) उमेश गित्ते – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक (गुन्हे), लक्ष्मीनगर पोलीस ठाणे

१२) मोहन खंदारे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा

१३) दिलीप दाईंगडे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा

१४)अमर काळंगे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येवलेवाडी पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक (गुन्हे), शिवाजीनगर पोलीस ठाणे

१५) युवराज हांडे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा

१६)विश्वजीत काईंगडे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक–१

१७)माया देवरे – पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा → पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

१८) मनोजकुमार लोंढे – पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा → पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहकारनगर पोलीस ठाणे

१९) निलेश बडाख – पोलीस निरीक्षक (गुन्हे), वारजे माळवाडी पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे

२०) पल्लवी मेहेर – पोलीस निरीक्षक (गुन्हे), येरवडा पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक (गुन्हे), वाघोली पोलीस ठाणे

२१) नितीन पांडुरंग भोयर – पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक, विशेष शाखा

२२) जितेंद्र कदम – पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा → पोलीस निरीक्षक, कल्याण शाखा

२३) सुनिता नवले – पोलीस निरीक्षक (गुन्हे), मार्केटयार्ड पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक (गुन्हे), येवलेवाडी पोलीस ठाणे

२४) धनंजय पिंगळे – पोलीस निरीक्षक (गुन्हे), शिवाजीनगर पोलीस ठाणे → पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

२५) गिरीश दिघावकर – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस ठाणे → वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे

याशिवाय गुन्हे शाखेतील युनिट-१ ते ७, अंमली पदार्थ विरोधी पथक, खंडणी विरोधी पथक, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक, प्रशासन, ए.एच.टी.यु. आणि भरोसा सेलमधील पोलीस निरीक्षकांच्या देखील अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे गुन्हे नियंत्रण, विशेष मोहिमा आणि नागरिकाभिमुख पोलीस सेवा अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |