Maharashtra Today News
Online GamblingCrime news:बारामती व दौंड तालुक्यात ऑनलाईन चक्रीचा विळखा; तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त, पालकांचा प्रशासनाकडे आक्रोश
चक्रीचा जुगार : कमाई चालकांची, बर्बादी खेळणाऱ्यांची
प्रतिनिधी:राम कांबळे
बारामती तालुक्यातील सुपे गावासह दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात सध्या अवैध ऑनलाईन चक्री, मटका व देसी हातभट्टी दारू यांचा सुळसुळाट झाल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. या अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून तरुण पिढी आर्थिक व मानसिक अडचणीत सापडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
स्थानिक माहितीनुसार, ऑनलाईन चक्रीमुळे अनेक तरुण मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने ऑनलाईन चक्रीच्या व्यसनाधीन झालेल्या तरुणांच्या मुलाखती घेतल्या असून, त्यांनी किती कर्जबाजारीपणा सहन केला आहे याची माहिती ‘महाराष्ट्र टुडे न्यूज’ या चॅनेलला दिली आहे.
दरम्यान, पीडित तरुणांच्या आई-वडिलांनी यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे ऑनलाईन चक्री चालवणाऱ्यांविरोधात लेखी अर्ज सादर केले आहेत. यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन यवत पोलीस स्टेशनकडून देण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली आहे.
बारामती तालुक्यातील सुपे गावातही ऑनलाईन चक्री, मटका व देसी हातभट्टी दारू खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी असून, तरुण पिढी या जाळ्यात अडकत चालली आहे.
👉 या पार्श्वभूमीवर नागरिकांना खुले आव्हान देण्यात येत आहे की, ज्यांच्याकडे ऑनलाईन चक्रीविषयी ठोस माहिती आहे त्यांनी निर्भयपणे समोर येऊन प्रशासन व पोलीस यंत्रणेला माहिती द्यावी, तसेच ऑनलाईन चक्री चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी ठाम मागणी करावी. नागरिकांच्या सहकार्याशिवाय या अवैध धंद्यांवर पूर्ण नियंत्रण आणणे कठीण असल्याचे मत व्यक्त होत आहे.
👉 तसेच, प्रशासनाने वेळेत ठोस कारवाई न केल्यास, पुढील अंकात नागरिकांकडून प्राप्त माहितीच्या आधारे ऑनलाईन चक्री चालवणाऱ्यांची विषय नावे प्रसिद्ध करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे. हा विषय जनहितासाठी सातत्याने लावून धरला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Online Gambling
Online Chakri Racket
Illegal Gambling
Baramati News
Daund News
Supe Village
Kedgaon Area
Youth Ruined by Gambling
Gambling Addiction
Suicide Due to Gambling
Illegal Activities
Matka Racket
Desi Liquor Business
Public Protest
Police Action
Yawat Police Station
Maharashtra Crime
Rural Maharashtra
Parents Protest
Social Impact of Gambling

