Maharashtra today news,,,
Municipal ElectionsPolitical Newsआमदार चेतन दादा तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे संघटन मजबूत; प्रभाग १७ मधून ‘ताई आपल्या हक्काची’ सौ. संगीता दत्तात्रय तुपे यांना विजय करा,,
माननीय आमदार, उत्कृष्ट संसदपटू श्री. चेतन दादा तुपे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली 2007 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत उमेदवारांचा प्रचार, जनसंपर्क, संघटन बांधणी तसेच बूथ पातळीवरील जबाबदाऱ्या सातत्याने पार पाडण्यात आल्या आहेत.
दत्तात्रय तुपे हे गेल्या २५ वर्षांपासून धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून समाजातील गोरगरीब कुटुंबे, सर्वसामान्य नागरिक, माता-भगिनी, युवक-युवती, विद्यार्थी तसेच गरजू रुग्ण यांच्यासाठी त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. शैक्षणिक साहित्य वाटप, आर्थिक सहाय्य, वैद्यकीय उपचारांसाठी मदत, सामाजिक उपक्रम तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अशा विविध माध्यमांतून समाजसेवेचे कार्य अखंडपणे सुरू आहे.
कोणतीही अपेक्षा न ठेवता, केवळ सामाजिक बांधिलकी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला अनुसरून हे कार्य सुरू असून, “आतापर्यंत काम करत आलो, आजही काम करत आहे आणि भविष्यातही अधिक जोमाने काम करत राहू,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक १७ मधून उमेदवारी मिळालेल्या सौ. संगीता दत्तात्रय तुपे या ‘ताई आपल्या हक्काची’ म्हणून सर्वसामान्यांमध्ये ओळखल्या जातात. महिला, माता-भगिनी, युवक-युवती, विद्यार्थी तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत त्यांची विशेष आस्था असून पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि नागरी सुविधा या विषयांना त्यांनी प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माननीय आमदार चेतन दादा तुपे पाटील यांचे नेतृत्व आणि जनतेचा विश्वास लक्षात घेता, प्रभाग क्रमांक १७ मधील सर्व मतदार मायबाप व बंधू-भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की ‘ताई आपल्या हक्काची’ सौ. संगीता दत्तात्रय तुपे यांना आपले अमूल्य मत देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

