ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Religious Event,,उद्योजक श्री. भारत काशिनाथ सातपुते यांचा ६१ वा अभिष्टचिंतन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार

 


Maharashtra today news,,,

प्रतिनिधी, ,शरद  दुधाळ पाथर्डी,,

Religious Event,,उद्योजक श्री. भारत काशिनाथ सातपुते यांचा ६१ वा अभिष्टचिंतन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार

साकेगाव (ता. पाथर्डी | जि. अहिल्यानगर) —

भोसरी–पुणे येथील श्री इंडस्ट्रीजचे संस्थापक व नामवंत उद्योजक श्री. भारत काशिनाथ सातपुते यांचा ६९ वा अभिष्टचिंतन सोहळा सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी साकेगाव येथे धार्मिक व भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.


हा मंगल सोहळा मिती माघ शुद्ध १ रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून, यानिमित्त संकीर्तनाचा विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमात रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक (नागपूरकर) यांचे सुश्राव्य व प्रेरणादायी हरिकीर्तन होणार असून, भाविकांसाठी हा कार्यक्रम अध्यात्मिक आनंद देणारा ठरणार आहे.

सामाजिक, औद्योगिक व धार्मिक क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान देणारे श्री. भारत सातपुते यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उद्योग क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्यावरील प्रेम, स्नेह व सदिच्छा व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

निमंत्रक

या शुभप्रसंगी पुढील मान्यवर निमंत्रक म्हणून उपस्थित आहेत—

श्री. साहेबराव सातपुते पाटील (भाऊ),

सौ. सुमन भारत सातपुते (पत्नी),

श्री. अंकुश काशिनाथ सातपुते (भाऊ),

श्री. घोंडीराम मारुती काकडे (मेव्हणे),

श्री. आनंद मारुती काकडे (मेव्हणे),

श्री. शंतनु प्रभाकर पाटील (जावई),

सौ. कांचन सातपुते पाटील (मुलगी),

चि. पवन भारत सातपुते (मुलगा).

संयोजक

समस्त ग्रामस्थ व मित्रमंडळ,

साकेगाव नाना–नानी पार्क मित्र मंडळ,

इंद्रायणीनगर, पुणे,

समर्थ कॉलनी मित्र मंडळ, इंद्रायणीनगर, पुणे,

तसेच ह.भ.प. श्री. गोरक्षनाथ महाराज.

स्थळ ,,,रेणुकामाता मंदिर, साकेगाव,ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर

या अभिष्टचिंतन सोहळ्यास आपली (तुमची) उपस्थिती लाभून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |