Maharashtra today news
महाराष्ट्र टुडे न्यूज
PuneCrime News दरोड्याची पूर्वतयारी करणारा ‘बचक्या’ टोळीतील सराईत आरोपी जेरबंद
पुणे | प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहिजे आरोपींवर कारवाई करत असताना गुन्हे शाखा युनिट–६ च्या पथकाने दरोड्याची पूर्वतयारी करणाऱ्या व जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या ‘बचक्या’ टोळीतील सराईत आरोपीस अटक केली आहे.
दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट–६ चे पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बंडगार्डन पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हा र. नं. ३५२/२०२५ व ३५०/२०२५ मधील निष्पन्न पाहिजे आरोपी राजेश उर्फ चिपाट्या उर्फ चौपाटी राजा बबलू मंगल मंडळ (वय २९, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, मूळ रा. दरभंगा, बिहार) हा अंगूर वाईन परिसरात थांबलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी ‘चौपाटी राजा’ या नावाने कुप्रसिद्ध असून दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मोबाईल चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत सक्रिय असलेल्या ‘बचक्या’ टोळीशी संबंधित आहे. तो सध्या मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यात जामिनावर होता.
■ आरोपीवरील गुन्हे
बंडगार्डन, लष्कर व विश्रामबाग पोलीस ठाण्यांत आरोपीविरुद्ध दरोडा, चोरी, मारहाण व धमकीचे एकूण ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
■ पोलिसांची कामगिरी
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट–६ चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकात सपोनि गदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, कॉप्स–२४ मार्शल तुळशीदास जाधव, महेंद्र आगळे, तसेच सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांचा सहभाग होता.
Crime News / Police Action / City Crime
Tags (टॅग / बॅग)
Dacoity Preparation
Wanted Criminal Arrested
Police Action
Crime Branch Unit-6
Bund Garden Police
Gang Crime
Bacchya Gang
Chaupati Raja
Robbery Case
Repeat Offender
Municipal Election Security
Pune Crime News
