ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Crime News / Local Crime खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस तामलवाडी पोलिसांनी केली अटक

Maharashtra today news

महाराष्ट्र टुडे न्यूज

 Crime News / Local Crime / Police News खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस तामलवाडी पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी अमोल धेंडे,,,,,

दिर–भावजयीतील अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या १३ वर्षीय मुलाचा कुन्हाडीने घाव घालून निर्घृण खून करून त्याचे प्रेत तलावाजवळील गवताखाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी साठवण तलावाजवळ ४ जानेवारी २०२५ रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४/२०२६ कलम १०३ (१) अन्वये दि. ६ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गालगत तामलवाडी शिवारात कदम यांची शेती असून ती शेती दत्ता कोरे याने बहईने घेतली होती. याच ठिकाणी उमरगा तालुक्यातील कोळसूर येथील ओमकार देवीदास कांबळे हा आपल्या भावजय ज्योती कांबळे हिच्यासोबत सालगडी म्हणून काम करत होता. ज्योती कांबळे हिचा १३ वर्षांचा मुलगा कृष्णा सदानंद कांबळे हा कधी वडिलांकडे तर कधी आईकडे राहत होता.

मुलगा कृष्णा हा आपल्या आई व चुलता ओमकार कांबळे यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती वडिलांना सांगत असल्याने तो दिर–भावजयीच्या संबंधात अडसर ठरत होता. ही बाब समजल्याने आरोपी ओमकार कांबळे यास राग आला. त्यातूनच त्याने १ जानेवारी रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तामलवाडी साठवण तलावात पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा पाइप बसवण्याच्या बहाण्याने कृष्णाला तलावाजवळ नेले. तेथे कुन्हाडीने घाव घालून कृष्णाची हत्या केली व त्याचे प्रेत तलावाजवळील गवतामध्ये लपवून ठेवून आरोपी पसार झाला.

या घटनेची प्रथम अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ०२/२०२६ कलम १९४ बी.एन.एस.एस. अन्वये नोंद करण्यात आली होती. पुढील तपासात मृताची ओळख पटवून गुन्हा दाखल करण्यात आला. गुप्त बातमीदारांची माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी ओमकार देवीदास कांबळे यास उमरगा तालुक्यातील कोळसूर गावातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्यासह पोलीस कर्मचारी जुबेर काझी, दिनकर तोगे, सुरज नरवडे, उमेश माने, नजीर बागवान, चालक तुराब शेख, हनमंत कोरे व नितीन भोसले यांनी केली.

Crime News / Local Crime / Police News

Tags

Murder Case

Child Murder

Crime Investigation

Tamlawadi Police

Tuljapur Taluka

Solapur District

Illegal Relationship

Accused Arrested

Police Action

Brutal Murder

Minor Victim

Maharashtra Crime News

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |