ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

Pune crime: ससून रुग्णालयातून एक महिन्याच्या बाळाला सोडून आई पसार; बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल

 


Maharashtra today news

Pune crime: ससून रुग्णालयातून एक महिन्याच्या बाळाला सोडून आई पसार; बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल
पुणे | प्रतिनिधी, अमोल धेंडे,
पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या एका महिलेने उपचार सुरू असलेल्या आपल्या एक महिन्याच्या बाळाला रुग्णालयात सोडून पसार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाळाच्या आईविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शीतल ऊर्फ सीता पवार (रा. सिद्धनाथ वाडी, वाई, जि. सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ऋषीकेश हनमंजू कनकावाड (वय 25, रा. बी.जे. मुलांचे वसतिगृह, पुणे; मूळ रा. नांदेड) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 20 सप्टेंबर रोजी शीतल पवार यांना प्रसूतीसाठी ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 24 मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, बाळाच्या प्रकृतीत काही गुंतागुंत असल्याने मागील एक महिन्यापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.



दरम्यान, उपचार व देखभालीची नितांत गरज असताना तसेच आपणच त्या बाळाची कायदेशीर पालक आहोत, याची पूर्ण जाणीव असूनही संबंधित महिलेने बाळाला रुग्णालयात एकटे सोडून दि. 29 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत ससून रुग्णालयातून पसार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


हा प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार बंडगार्डन पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सध्या बाळाची काळजी रुग्णालय प्रशासनाकडून घेतली जात असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या घटनेमुळे रुग्णालय परिसरासह शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपी महिलेचा 

शोध सुरू आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |