Maharashtra today news
. Thane crime :- नऊ लाखांच्या कर्जाचा तगादा; वाहन व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या
ठाणे | प्रतिनिधी, सुजाता सरेकर
ठाण्यातील कासारवडवली परिसरात कर्जाच्या तणावातून एका 30 वर्षीय वाहन व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. साजीद मुल्ला असे मृत व्यावसायिकाचे नाव असून त्यांनी आर्थिक दबावामुळे गळफास घेऊन जीवन संपवले.
मिळालेल्या माहितीनुसार, साजीद मुल्ला हे वाहन व्यवसाय करत होते. व्यवसायासाठी त्यांनी हजरत इरफान नोडे (वय 35) यांच्याकडून सुमारे नऊ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी आरोपीकडून सातत्याने तगादा व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप साजीदच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी साजीदची पत्नी अरबिना मुल्ला (वय 26) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, कर्जाच्या नावाखाली साजीदवर सतत दबाव टाकला जात होता. या मानसिक त्रासामुळेच पतीने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, काही नातेवाइकांनी असा दावा केला आहे की साजीदने संबंधित कर्जाची रक्कम फेडली होती. तरीसुद्धा आरोपीकडून तगादा व दबाव कायम ठेवण्यात आला, ज्यामुळे साजीद प्रचंड तणावाखाली होता, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कर्जाच्या तणावामुळे तरुण व्यावसायिक आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त के
ली जात आहे
.Thane Crime
Crime News
Maharashtra News
PSuicide Case
Financial Crime
Thane Crime
Kasarvadavali
Vehicle Businessman Suicide
Loan Harassment
Financial Stress
Suicide Case Thane
Businessman Death
Police Investig
ation
Maharashtra Crime News
