ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

लातूरने गमावले ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर; शहर बंद, जनसागर उसळला

Maharashtra today news

लातूरने गमावले ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर; शहर बंद, जनसागर उसळला,

 लातूर | प्रतिनिधी ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री व लातूरचे माजी खासदार शिवराज पाटील चाकूरकर यांना आज संपूर्ण लातूर जिल्ह्याने अश्रूपूर्वक निरोप दिला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लातूर शहरात जनसागर उसळला होता. सर्व स्तरातील नागरिक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली श्रद्धांजली अर्पण केली.

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. त्यांच्या निधनामुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर शहर पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते. अनेक व्यापारी संघटना, सामाजिक संस्था व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला.

अंत्ययात्रेदरम्यान “शिवराज पाटील अमर रहे” अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यांच्या नेतृत्वाखालील शांत, संयमी व लोकाभिमुख राजकारणाची आठवण नागरिकांनी व्यक्त केली. शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत लातूरच्या विकासासाठी तसेच देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.


राज्य व केंद्रातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. लातूरने आज एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत होती.

State News

Maharashtra

Latur

Political News

Obituary

Shivraj Patil Chakurkar

Former Union Home Minister

Latur News

Latur City Closed

Last Rites

Public Mourning

Tearful Farewell

Veteran Leader

Political Demise

Maharashtra Politics

Breaking News Latur




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |