ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

PMC Election Municipal News:महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा इशारा: नियम पाळले नाही तर कारवाई अनिवार्य



महाराष्ट्र टुडे न्युज 

Municipal News

 PMC Election:महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा इशारा: नियम पाळले नाही तर कारवाई अनिवार्य

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी,, अमोल धेंडे 

महापालिका हद्दीत बेकायदा जाहिराती लावणाऱ्या राजकीय पक्षांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे. बेकायदा जाहिरातींवर होणारा सर्व खर्च थेट संबंधित राजकीय पक्षाच्या खात्यात जमा केला जाईल, असा स्पष्ट इशारा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.


शहरात राजकीय पक्षांकडून परवानगीशिवाय लावण्यात येणाऱ्या बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग्स आणि जाहिरात फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.


आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाची, पदाधिकाऱ्यांची किंवा कार्यकर्त्यांची बेकायदा जाहिरात आढळल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात येईल. तसेच ही जाहिरात काढण्यासाठी झालेला संपूर्ण खर्च संबंधित राजकीय पक्षाच्या खात्यावर आकारण्यात येणार आहे.

महापालिकेच्या जाहिरात धोरणानुसार परवानगीशिवाय लावलेल्या जाहिरातींवर कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला असून यामध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सर्व राजकीय पक्षांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या निर्णयामुळे आगामी काळात शहरातील राजकीय जाहिरातबाजीवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे

स्थानिक राजकारण / Local Politics

महापालिका / Municipal News

प्रशासन / Civic Administration

जनहित / Public Interest

पिंपरी चिंचवडPimpri Chinchwad

बेकायदा जाहिरातIllegal Advertisement

राजकीय पक्ष / Political Party

महापालिका आयुक्त / Municipal Commissioner

नवल किशोर राम / Naval Kishore Ram

BJP विरोध / Anti-BJP

शहरातील कारवाई / City Action

यमांचे उल्लंघन / Rule Violation

Maharashtra today news

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |