ADVERTISEMENT
Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

Live TV

दCrime Branch Pune:-रोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस गुन्हे शाखेकडून अटक

 


Maharashtra today news

Crime Branch Unit–3दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस गुन्हे शाखेकडून अटक

पुणे | दि.दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस पुणे गुन्हे शाखा युनिट–३ ने शिताफीने अटक केली आहे.

दि. रोजी गुन्हे शाखा, युनिट–३ येथील पोलीस अमलदार पंढरीनाथ शिंदे, अमोल काटकर, किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे व तुषार किंद्रे हे वरिष्ठांच्या आदेशानुसार पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी सिंहगड रोड, नांदेड सिटी व उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.

यावेळी पोलीस अमलदार पुरुषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की, उत्तमनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १४५/२०२५ अन्वये दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी साईराज अतुल तावरे (वय १९ वर्षे, रा. तुकाईनगर, समाजमंदिराजवळ, वडगाव बु.गा., पुणे) हा त्याच्या राहत्या घरी आला आहे.


या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट–३ च्या पथकाने तात्काळ सापळा रचून नमूद आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने सदर गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे. तसेच तपासात तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचेही निष्पन्न झाले आहे.


सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३३३, ३(५), ३२४ (४), भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (सी) व १३५ अन्वये दाखल आहे.

सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री. विजय कुंभार युनिट-३ यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अगंलदार पंढरीनाथ शिंदे, अमोल काटकर, किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Author

मुख्य संपादक - गोरख सोनवणे

9503585893

gorakhsonwane234@gmail.com

Sadesatranadi Road, Malwadi, Hadapsar, Pune 28

Google AdSense Icon Advertisement
Design by - Blogger Templates |