महाराष्ट्र टुडे न्यूज
HadapsarAccident / Road Accident / Crime News:-हडपसर येथे पीएमपीएल बसच्या अपघातात महिला ठार, चालकाविरोधात गुन्हा दाखल
हडपसर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १०७८/२०२५ भा.न्या.सं.क. २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४, १७७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १६/१२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास सुमारे हडपसर गाडीतळ येथील बडदे उद्यान, हडपसर भाजी मार्केटजवळ, हडपसर, पुणे येथे पीएमपीएल बसवरील चालकाने वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे, अविचाराने व भरधाव वेगात बस चालवली. त्यावेळी फिर्यादी व त्यांची मावशी सुमन हनुमंत क्षिरसागर, वय ४९ वर्षे, रा. मार्केटयार्ड, पुणे या रस्ता ओलांडत असताना सदर बसने त्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात सुमन क्षिरसागर यांना गंभीर जखमा होऊन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर पीएमपीएल बस चालकाविरुद्ध वरील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालकास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, मोबा. नं. ८७७९४२३४६३, हडपसर पोलीस स्टेशन करीत आहेत.
Accident / Road Accident / Crime News
▪️ Hadapsar
▪️ Pune
▪️ PMPML Bus
▪️ Road Accident
▪️ Rash Driving
▪️ Negligent Driving
▪️ Woman Death
▪️ Traffic Rule Violation
▪️ Motor Vehicles Act
▪️ Had
apsar Police
---
