Title: देशी बनावटी पिस्टलसह इसम जेरबंद – पुणे गुन्हे शाखा युनिट १ ची धडाकेबाज कारवाई
Maharashtra today news,,
Date: २२/११/२०२५
Category: Crime / गुन्हेगारी
Subcategory: Police Action / Raids / Armed Robbery
Tags: armed robbery, crime raid, Pune crime, police action, illegal arms, gun seizure
Content:9503585893,
दि. २२/११/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ०१ चे पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस हवालदार हेमंत पेरणे व पोलीस अंमलदार निलेश साबळे यांना त्यांच्या गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, कोंबडी पुल, जन्म–मृत्यु नोंदणी कार्यालयाजवळ, मंगळवार पेठ, पुणे येथे एका इसमाकडे गावठी कट्टा असून तो गुन्हा करण्याच्या इराद्याने उभा आहे.
ही माहिती तत्काळ युनिट १ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव यांना कळविण्यात आली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे यांना पथकासह तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
त्याअन्वये पथकाने सांगितलेल्या ठिकाणी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव:रमजान उर्फ टिपू आदम पटेल (वय ३३ वर्षे) रा. भाजी बाजार, शिरूर, जि. पुणे
असे कळले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला ₹५०,०००/- किंमतीचा गावठी पिस्टल व खिशात ₹१,०००/- किंमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले.या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन येथेगु. र. नं. २१५/२०२५आर्म्स अॅक्ट कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली:मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे शहर – श्री. पंकज देशमुख मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) पुणे शहर – श्री. निखिल पिंगळे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) पुणे शहर – श्री. विजय कुंभार कारवाई करणारे अधिकारी / अंमलदार: पोउनि राहुल मखरे, पोहेम हेमंत पेरणे, निलेश साबळे,शशीकांत दरेकर, नितीन जाधव, अनिकेत बाबर, शुभम देसाई,अभिनव लडकत, मयुर भोसले, सिद्धेश्वर वाघमारे,उमेश मठपती, सुहास डोंगरे, युवराज कांबळे,सदेश काकडे, ज्योती मुल्का, रुक्साना नदाफ, मयुरी जाधव
