प्रमाणपत्र वितरण सोहळा
Maharashtra Today News
Category: Social / समाजकारण
Subcategory: Health / Blood Donation / Social Work
Tags: blood donation camp, Varvand, Sarnot Foods, Sarnot Fireworks Mart, Mayur Sarnot, Ahimsa Navkar Foundation, Pune social news, blood shortage, health awareness
Location: Varvand, Pune District
Content: 9503585893
Reporter: पुणे प्रतिनिधी – फिरोज मोबाईल
अहिंसा नवकार फाउंडेशनच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद; युवकांनी पुढे येऊन अशा सामाजिक रक्तदान मोहिमा राबवाव्या – मयूर सरनोत
रक्तदान करताना रक्तदाता
वरवंड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरनोत फुड्स आणि सरनोत फटाका मार्ट यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये तब्बल १४० रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजोपयोगी कार्यात सहभाग नोंदविला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर, डॉक्टर, रक्तदाते यांचे स्वागत करून आभार विशाल सरनोत (वरवंडकर) यांनी मानले.
अहिंसा नवकार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मयूर सरनोत (वरवंडकर) यांनी सांगितले की,
“सध्या रक्ताची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. रक्तदाता हा रुग्णांसाठी आशेचा किरण ठरतो. समाजोपयोगी कार्य म्हणून रक्तदान शिबिरे आयोजित करणे ही काळाची गरज आहे. एखाद्या रुग्णाला वेळेवर रक्त मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. युवकांनी पुढे येऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करून रक्ततुटवडा कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.”

