![]() |
.![]() |
| दरोडा टाकणारे टोळी अटक |
Maharashtra today news
Location: Pune / Buldhana
Summary: The Marketyard police successfully
captured a highly skilled female robbery gang that had been committing thefts in the Marketyard area within just a few days, marking a significant achievement.
Information on Arrested Accused:
Sunita Pintu Solanki (22)
Meena Ravi Solanki (23)
Batti Ganpat Shinde (25)
Pooja Jagdev Solanke (20)
Aina Ankush Solanke (27)
Minor girl (sent to juvenile home
मार्केटयार्ड परिसरातील दरोडा करणाऱ्या महिलांच्या सराईत टोळीला पोलिसांचा मोठा यश
पुणे / बुलढाणा: मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकून पसार झालेल्या महिलांच्या सराईत टोळीला मार्केटयार्ड पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्यातील मोहिदेपुर गावातून पाच महिला आणि एक विधिसंघर्षित बालिका यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीच्या सदस्यांमध्ये सुनिता पिंटू सोळंकी (२२), मीना रवी सोळंकी (२३), बत्ती गणपत शिंदे (२५), पूजा जगदेव सोळंके (२०), आईना अंकुश सोळंके (२७) यांचा समावेश आहे. अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.अत्यंत चाणाक्ष गुन्हेगारी पद्धती आणि सतत ठिकाण बदलत राहण्याच्या सवयीमुळे या टोळीचा शोध घेणे आव्हानात्मक बनले होते. तरीही मार्केटयार्ड पोलिसांनी गाव, शेतजमिनी आणि जंगलात तासन्तास शोधमोहीम राबवून अखेर सर्व आरोपींना जेरबंद केले.
घटना व तपास:
२१ नोव्हेंबर रोजी तपास पथक मोहिदेपुरमध्ये पोहोचताच गावात हालचाल वाढली. आरोपी महिला पोलिस आल्याची चाहूल लागताच गावातून पळून शेतात आणि जवळच्या जंगलात लपल्या. स्थानिक पोलीस आणि गावचे पोलीस पाटील गोविंदा शिंदे यांच्या मदतीने तपास अधिक तीव्र करण्यात आला. तासन्तास छुप्या जागांचा शोध घेतल्यानंतर अखेर सर्व आरोपी विविध ठिकाणी लपून बसलेल्या अवस्थेत सापडल्या.
पुणे आणि बुलढाणा शहरांमधील अंतर जवळपास ३०० किलोमीटर असूनही पोलिसांनी शेतात, पडीक जमिनीत आणि घनदाट झुडपांमध्ये लपलेल्या आरोपींना शोधून ताब्यात घेतले.
मार्केटयार्ड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमुळे नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी मोठा धक्का बसलेल्या गुन्हेगारी टोळीवर ठोस कारवाई झाली आहे.

